उस्मानाबाद /प्रतिनिधी

आळणी उस्मानाबाद येथील भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे प्रथम वर्षाचा  उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्रथम वर्ष बी.फार्मसी 100% निकाल लागला असून निहारिका दुबे 79.70 %गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला व मधुरा मुंडे 78.60 %गुण मिळवून द्वितीय तर चौधरी सिद्धी 77.20%गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. 

सदर परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे डॉ.प्रतापसिंह पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ननवरे एस. बी. तसेच डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.केदार एस .आर.प्रा नागरगोजे आर.बी.,प्रा धस  पी .बी . प्रा सृष्टी थोडसरे,प्रा खडके अक्षदा,अमोल वाघमारे,डॉ.पवार ए आर. यांनीही अभिनंदनेले आहे.

 
Top