उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरातील नव्याने वर्ग २ मध्ये जमिनीच्या केलेल्या नोंदी रद्द करून वर्ग १ मध्ये त्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी उस्मानाबाद शहर शेतकरी विकास समितीच्यावतीने एका निवेदनाद्वारे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे दि.११ नोव्हेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद शहरातील वतनी, खिदमास जमिनी या हैदराबाद इनाम निर्मूलन कायदा १९५४ प्रमाणे खालसा झालेल्या आहेत. १९६६ च्या कायद्याप्रमाणे सर्व वतनी इनामे खालसा झालेली आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी त्यावेळेसच्या शेतसाऱ्याच्या ७ पट व २९ पट रकमा भरून जमिनी या खालचा करून घेतलेल्या आहेत. सक्षम प्राधिकरणाने त्याची खालचा पत्रे आम्हाला दिलेली आहेत. याची शासन दप्तरी नोंद असून सदर सर्व पुरावे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. सन १९५२-५३ च्या खासरा पाहणी अहवालाप्रमाणे चुकीची पाहणी केलेली असून तलाठी व मंडळ अधिकारी यांचे दप्तर १८५४ नंतर अस्तित्वात आलेले आहे. त्यामध्ये या जमिनी या वर्ग १ मध्ये आहेत. उस्मानाबाद जिल्हासह भारताच्या नीती आयोगाने मागासलेला जिल्हा म्हणून घोषित केला आहे. नीती आयोगाने केलेल्या सर्वेनुसार हा जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच उस्मानाबाद शहरांमध्ये माणसांचे अर्थकारण उंचावण्यासाठी कोणतेही उद्योगधंदे, शासकीय किंवा खासगी दिसून येत नाही. या ठिकाणी कोणतीही मोठी बाजारपेठ उभारलेली नाही, येथे शैक्षणिक प्रगतीचाही अभावच असल्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील तरुण हाताला काम मिळण्यासाठी सातत्याने स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे प्रतिबंधित व प्रतिबाधिताच्या नावाखाली शेतकऱ्यांना अडचणीत न आणता रीतसर जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. 

यावर समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष उमेश राजे, विश्वास शिंदे, मनोज राजे, भाऊसाहेब उंबरे, एॅड. मिलिंद पाटील, संजय पवार, रणधीर देशमुख, गंगाधर महाजन, अनिल पवार, अतुल महाजन, शिवाजी नाडगौडा, सतीश राजेनिंबाळकर, कुलदीप पवार, किशोर देवकते, दशरथ देवकते, छाया देवकते, लोचनाबाई देवकते, संजय मनोज कोचेटा, कमल राजेनिंबाळकर, राजेश बांगड, सागर देवकते, श्रीमंत देवकते, संतोष देवकते, दिनेश बंडगर, दत्ता सोलंकर, धनंजय देवकते, अभिजीत पवार, निलेश वाघमारे, बालाजी चालुक्य, आनंद जगदाळे, सचिन विश्वेकर, तुकाराम विधाते, फिरोज पल्ला, व्ही.आर. पवार, रामकृष्ण पवार, अविनाश पवार, प्रमोद पवार, अतुल पवार, अमोल पवार, राजेंद्र बहिरे, शीला देशमुख, समंदर चौधरी, सुभाष शिंदे, शंकर जेगडे, संतोष कुलकर्णी, भागवत सातपुते, सुलभा कुलकर्णी, उदयसिंह राजे व सुभाष शिंदे आदींच्या सह्या आहेत.

 
Top