धाराशिव येथे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचला सेवेची संधी देण्याचे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे माजी सिनेट  सदस्य सुधीर अण्णा पाटील यांनी केले. ते उस्मानाबाद  येथे विद्यापीठ विकास मंचच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यापीठ विकास मंचचे सचिव प्राध्यापक गजानन सानप, प्राध्यापक सचिन कंदले , प्राचार्य अजित मसलेकर , प्राचार्य प्रशांत चौधरी , प्राचार्य विक्रम सिंह माने , उमेदवार प्राध्यापक गोविंद काळे, अमर कदम, चंद्रकांत फड, सौ ज्योती तुपे , मोहम्मद अझरुद्दीन, सौ छाया खाजेकर, संतोष थोरात, प्राध्यापक कमलाकर जाधव , प्राध्यापक मकरंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना श्री सुधीर अण्णा पाटील पुढे म्हणाले की धाराशिव सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात उच्च शैक्षणिक क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती होण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्र सक्षम होण्याची गरज आहे. विद्यापीठ विकास मंचचे सर्व उमेदवार हे अभ्यासू असून त्यांना विजयी केल्यास विद्यापीठातील गैरकारभार बंद होऊन  विद्यार्थी केंद्रित प्रशासन मिळवून देऊन राजकारण विरहित निकोप शैक्षणिक स्पर्धेचे वातावरण विद्यापीठात तयार होईल. असेही त्यांनी सांगितले.
   यावेळी बोलताना प्राध्यापक गजानन सानप , प्राध्यापक गोविंद काळे यांनी मनोगत व्यक्त केले.   यावेळी विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार अमर कदम, चंद्रकांत फड, मोहम्मद अझरुद्दीन, सौ. छाया खाजेकर ,सौ. ज्योती तुपे, संतोष थोरात, प्राध्यापक मकरंद चौधरी प्राध्यापक कमलाकर जाधव यांनी आपला परिचय करून दिला.विद्यापिठात प्राध्यापकांचे आणि पदवीधरांचे प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास पाठक यांनी केले सूत्रसंचालन विशाल केदार यांनी केले तर आभार अभावीप शहर मंत्री तेजसिंह कोळगे यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top