तुळजापूर  / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूरात निघणारा मराठा आरक्षण मोर्चा चळवळीला  व   मराठा समाजासाठी  वेगळी दिशा  देणारा  ठरावा असा मोर्चा  काढण्याचा निर्णय  आई तुळजाभवानीच्या पावन भूमीत सकल मराठा समाज वतीने  मोर्चा काढण्यासाठी  तुळजापूर शहरातील  सकल मराठा बांधवांची बैठक शनिवार दि.१९रोजी सांयकाळी पाच वाजता  शासकीय  विश्रामधाम  येथे  संपन्न झाली .

यावेळी बोलताना मराठा समाजातील अनेक मान्यवर  म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा  आधार घेवुन शाषकिय  व न्यायालय पातळीवर  प्रभावी पणे  लढा उभारला तर आपणास आरक्षण मिळेल यासाठी इडब्ल्यु एस च्या दहा टक्के वाढीव आरक्षण  निर्णयाचा आधार घ्यावा,  मराठा आरक्षण व समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी  आपणास दबाबगट तयार करुन  आणखी जोर लावावा लागेल  आता आपल्याला  वेगळ्या पध्दतीने  मराठा आरक्षण लढा उभारावा लागेल .आरक्षण नाही तर मतदान नाही ही भूमिका घेण्याची वेळ आल्याची यावेळी विचार मांडले 

 या बैठकीत मोर्चा आरक्षण दिनांक निश्चित करण्यावर चर्चा झाली ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर मोर्चा घेण्याबाबतीत निर्णय झाला.मोर्चा स्वरुप कसे असे असावे यावर  सविस्तर चर्चा झाली.


 
Top