तुळजापूर / प्रतिनिधी-

 जिल्हाधिकारी  उस्मानाबाद यांचे संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ऊसतोड कामगार यांना कारखाना स्थळी धान्य वाटप योजने अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील कंचेश्वर साखर कारखाना , मंगरूळ ता . तुळजापूर येथे रास्त भाव दुकानाचे उद्घाटन  सौदागर तांदळे , तहसीलदार तुळजापूर यांचे हस्ते करण्यात आले . 

कंचेश्वर कारखाना येथील राज्यातील परराज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील आलेल्या ऊस तोड कामगार यांना मा तहसीलदार तांदळे साहेब , कारखाना जनरल मनेजर श्री गाढे   , जनरल मनेजर अॅग्री बाराते , यांचे हस्ते ऊस तोड कामगार यांना पोर्टबिलीटी द्वारे धान्य वितरण करण्यात आले . तुळजापूर तालुक्यात कोणत्याही रास्तभाव दुकानात ऊसतोड कामगार यांना रास्तभाव दुकानातून धान्य उचल करता येईल असे मा तहसीलदार साहेब यांनी सांगितले.

प्रसंगी   शिंदे सी व्ही नायब तहसीलदार पुरवठा , पवार साहेब , अमर गांधले, मंडळ अधिकारी श्री शिंदे  तसेच कंचेश्वर कारखाना येथील सुपरव्हाजर दत्ता जाधव , सुभाष सरडे , चेतन धनके तसेच रास्तभाव दुकानदार श्री जितेंद्र सरडे , अण्णा शेटे , ऊस तोडणी ठेकेदार व लेबर , शेतकी अधिकारी ऊस तोड कामगार उपस्थित होते .


 
Top