उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन त्यांना न्याय देण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या पवन राजे मित्र मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी पवन राजे मित्र मंडळाच्या शिष्टमंडळास मंत्रालयात भेटी दरम्यान दिले असल्याची माहिती मित्र मंडळाचे संस्थापक श्याम कुलकर्णी यांनी दिली.

पवन राजे मित्र मंडळाचे संस्थापक श्याम कुलकर्णी, अध्यक्ष काकासाहेब संदिपान खोत, सचिव भारत शिंदे, सत्यनारायण लोमटे, तेरणा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन रमाकांत टेकाळे आदींनी मंत्रालयामध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पवन राजे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बाळासाहेब शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे डिसेंबरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश सोहळा होणार आहे. त्यामुळे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून या मेळाव्याची तयारी सुरु झाली असून कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.


 
Top