नळदुर्ग   / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील रामकृष्ण संगीत विद्यालयाची मुहूर्तमेढ रचणारे तसेच अनेकांना संगीत विषयांचे ज्ञान देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणारे संगीत तज्ञ सेवानिवृत्त शिक्षक सुमंत दासराव रामदासी यांचे आज हृदय विकाराने निधन झाल्याने नळदुर्ग शहरावर शोककळा पसरली आहे.

सुमंत रामदासी यांनी  संगीत विषयातील संगीत विशारद व संगीत अलंकार ही सर्वोच्च पदवी 1992 मध्ये संपादन केली होती. त्या पदवीचा फायदा इतरांनाही व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेकांना संगीताचे शिक्षण व मार्गदर्शन मोफत करून अनेकांना पायावर उभे राहण्यास मदत केली होती. गेल्या 40 वर्षांपासून ते अखिल भारतीय गांधर्व संगीत मंडळ मुंबई यावर ते सदस्य म्हणून काम पाहत होते . प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या संगीत विद्यालया मार्फत घेतल्या जाणाऱ्या संगीत विषयातील सर्व गायन , वादन व नृत्य परीक्षांचे परीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले होते .अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात ते सेवेत असताना अनेकांना त्यांनी संगीत विषयात पारंगत केले आहे . त्यांच्या मार्गदर्शनामुळेच नळदुर्ग मधील कै. प्रा जावेद काजी , श्री चंद्रकांत कदम व स्वतःहा मी  संगीत विशारद ही पदवी घेऊ शकलो . नळदुर्ग शहरात संगीत विषय जिवंत ठेवणारे एक महान व्यक्तिमत्त्व आज काळाने हिरावून नेलेआहे, त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात कधीच भरून येणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे हे मात्र निश्चित ।


 
Top