उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघाने ५५ व्या राष्ट्रीय अंिजक्यपद पुरुष महिला खो खो स्पर्धेची विजयी सलामी दिली.

भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात महाराष्ट्राचे दोन्ही सामने मॅटवर झाले. पुरुष गटात त्यांनी मध्यप्रदेशवर २०-८ असा डावाने विजय मिळविला. यात सुयश गरगटे २.२० मिनिटे पळती व ५ गडी बाद करीत अष्टपैलू अष्टपैलू खेळी केली. रामजी कश्यपने ३.२० मिनिटे भक्कम संरक्षणाची बाजू सांभाळली. निहार दुबळे याने आपल्या धारदार आक्रमणात गडी टिपले. प्रदेश कडून विवेक यादव व सागर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत एकाकी लढत दिली.

महिला गटातील महाराष्ट्रने तेलंगणाचा १९-६ असा डावाने पराभव केला. यात प्रियांका इंगळे यांनी तेलंगणाचे सात बळी टिपले. रेश्मा राठोड हिने (२.१० मिनिटे व ४ बळी) अष्टपैलू खेळ केला तर रूपाली बडे व दिपाली राठोड ( प्रत्येकी २.५० मिनिटे ) व अपेक्षा सुतार ( २.४० मिनिटे)यांनी संरक्षणाची बाजू सांभाळली. तेलंगणाच्या कृष्णम्मा हिची अष्टपैलू लढत अपुरी पडली.


 
Top