लोहारा/प्रतिनिधी

शिवसेना पक्षातील फुटिनंतर लोहारा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक लोहारा उमरगा विधानसभेचे संपर्कप्रमुख अनंत पाताडे यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकिला लोहारा तालुक्यातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख व शिवसैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी पाताडे यांनी शिवसैनिकांना बोलताना सर्वानी एकजुटिने संघटन वाढवण्यासाठी काम करावे.लोहारा तालुक्यातील शाखा या कार्यान्वित करुन येणार्या पंचायत समीती व जिल्हापरिषद निवडणुकित सक्रिय करण्यावर भर द्यावा. तसेच सामान्य नागरीकांचा अडचणी सोडवण्यास सर्व पदाधिकारी यांनी पुर्विपेक्षा जोमाणे कार्य करावे असे सांगीतले. काहीही अडचण असेल तर पक्ष आपल्या पाठिशि खंबिर उभा राहिल याची ग्वाही दिली. यावेळी माजी जि.प.सदस्य दिपक जवळगे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन महेबुब गंवडी यांनी केले तर आभार युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी मानले. 

यावेळी माजी जि.प.सदस्य दिपक जवळगे, उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उपतालुका प्रमुख सुधाकर पाटिल, शहरप्रमुख  सलिम शेख, शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे,माजी पं.स. सभापती विलास भंडारे, सरपंच सचिन गोरे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रा.पं.स.महेबुब गंवडी, पंडित बारगळ, गणेश जाधव, अविनाश राठोड,पवन मोरे, पंडित ढोणे, बंकट माळी, महम्मद हिप्परगे, सुभाष बिराजदार, नितिन जाधव, आकाश जावळे, शुभम जावळे, अनिल मोरे, गोपाळ गोरे, पिंटु गोरे, चेतन गोरे, बालाजी जाधव, अमोल पाटिल, रघुविर घोडके, गोपाळ गोरे, गोपाळ मोरे, सिध्देश्वर गिराम, कुंडलीक सुर्यवंशी,अनिल गोरे, अहमद शेख, राजेंद पवार, राजेद्र लोभे, बाबासाहेब मोरे, शाम पाटिल, कमलाकर कदम, दिलिप कदम, सदाशिव हुलसुरे यांच्यासह लोहारा तालुक्यातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख शिवसैनीक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top