उस्मानाबाद /प्रतिनिधी -

 बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी, शाकीर शेख, हसन शेख आदी उपस्थित होते.


 
Top