तुळजापूर /प्रतिनिधी -

 तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्यामार्फत भाविकांसाठी सेवा सुविधांचे उपाययोजना करण्याबाबत तसेच तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ अशी ओळख मिळवून देण्यासाठी अभ्यास समिती तिरुपती बालाजी, शिर्डी, शेगांव आदी देवस्थानांच्या अभ्यास दौरा करणार, असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी यावेळी सांगितले. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा चर्चा प्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्ट्रक्टवेल कन्सलटंन्सी या संस्थेचे एम.डी. श्री.रायकर, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तुळजापूर मंदिर संस्थानच्या तहसीलदार योगिता कोल्हे, तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे तसेच इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

  तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त समितीने पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनानुसार एकत्रित विकास आराखडा तयार करण्याबाबत मंजूरी दिलेली आहे. त्याकरिताची  ई-निविदा दि. 21 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. एकत्रित विकास आराखडा तयार करताना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानशी संलग्नीत सर्व संबंधितांशी विचार विनिमय करुन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा विकास आणि भाविकांची सोईसुविधा याबाबत विश्वस्त समितीने संलग्न शासकीय विभाग आणि पदाधिकारी यांच्या समवेत चर्चासत्र  येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

 या चर्चासत्रामध्ये भाविकांसाठी दर्शन मंडप सुविधा, अत्याधुनिक संग्रहालय, भाविकांच्या दर्शन रांगा, भाविकांना प्रसाद वाटप व्यवस्था, मंदिर व मंदिर परिसर तसेच दर्शन मंडप सुरक्षा व्यवस्था, भाविकांच्या पवित्र स्नान ठिकाणाचे व्यवस्थापन, भाविकांच्या आरोग्य विषयक सुविधा, मंदिर व मंदिर परिसरातील आग विषयक सुरक्षा, मंदिरातील प्रशासकीय कामकाज, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जोखीम ओळखणे, भाविकांच्या भौतिक साईसुविधा, भाविकांचे गर्दी व्यवस्थापन, मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, अभ्यागत व्यवस्थापन सुविधा, मंदिर व मंदिर परिसरातील पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था, सुरक्षा तरतूद व व्यवस्थापन, मंदिर व मंदिर परिसरातील वायुवीजन (हवा खेळती राहील अशी व्यवस्था), सार्वजनिक संपर्क प्रणाली, मंदिर व मंदिर परिसरातील अग्निशमन यंत्रणा, मंदिर व मंदिर परिसरातील CCTV अत्याधुनिक कंट्रोल रुम, मंदिर व मंदिर परिसरातील कचरा व्यवस्थापन (घन कचरा), मंदिरात प्रवेश करतेवेळी DFMD व HFMD सुविधा, भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि विश्रांती थांबे, मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्थापन, पादत्राण कक्ष व सामान कक्ष व्यवस्थापन, अभिषेक व सिंहासन पूजा व्यवस्थापन, व्यावसायिक (व्यापारी) आस्थापना, महत्वाचे व अतिमहत्वाचे व्यक्तींचे दर्शन व्यवस्थापन, भाविकांसाठी अन्नछत्र, मंदिरातील प्रथमोपचार आणि बचाव उपकरणे व साठवण व्यवस्था, दर्शन मंडप व मंदिर परिसरातील मार्गदर्शक चिन्ह व्यवस्थापन, भाविकांचे रांग व्यवस्थापन (तटबंदीचे आत, बाहेर व शहर परिसर), भाविकांसाठी सार्वत्रिक प्रवेश व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, भाविकांचे रिसेप्शन आणि तिकीट (बायोमॅट्रीक पास यंत्रणा) काउंटर, मंदिरातील महत्त्वाचे ठिकाणाचे निरीक्षण वेळापत्रक, दिव्यांग, वृध्द, लहान मुले व माता यांची दर्शन व्यवस्था, भाविकांच्या सुविधेकरिता अत्याधुनिक पार्कींग व्यवस्था, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, बाहेर पडण्याचा मार्ग, कुलाचार व्यवस्थापन, दर्शन मंडपामध्ये आराम कक्ष आणि अल्पोपहार कक्ष व्यवस्था आदी विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली.


 
Top