तुळजापूर /प्रतिनिधी -

 तालुक्यातील दहिवडी येथील मायभूमी फाउंडेशन यांच्यावतीने बुधवार दि.२६ रोजी जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात आदित्य गाटे ,वैष्णवी कोल्हे ,अपेक्षा गाटे, ओंकार गाटे, योगिता गवळी ,सचिन अंबुरे या दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बालरोग तज्ञ डॉ.मकरंद बाराते,प्रा.कानिफनाथ माळी,उपअभियंता राम दिक्षित, डॉ. हिम्मत गाटे यांच्या  हस्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

 येथील माय भूमी फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक किरण गाटे यांनी केले.आभार गणेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नियोजन समिती अध्यक्ष अतुल गाटे उपाध्यक्ष किरण भालशंकर यांनी परिश्रम घेतले...!


 
Top