उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जागतिक दिव्यांगदिना निमित्त दिव्यांगाना 5% निधीचे वाटप करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने न.प. मुख्यधिकारी यांना देण्यात. 

 या निवेदनात दरसाला प्रमाणे नगरपालिकेच्या वतीने यावर्षीही दिव्यांगाना नगर पालिकेच्या उत्पन्ननिधीतुन 5% निधी हा शहरातील पात्र लाभार्थीना त्यांच्या खात्यावर जमाकरून त्याना दिव्यांग दिनानिमित्त नगरपालिका प्रशासनाकडून अनोखी भेट देण्यात यावा जेणे करून सर्व दिव्यांग बांधवांचा दिव्यांग दिन उत्साहात साजरा होईल अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष मयुर काकडे शहराध्यक्ष जमीर शेख,शिवकुमार माने, संजय शिंदे, राजेश भिसे, आयान शेख,रशीद शेख,साजित सय्यद, सुनील सज्जेवार,उपस्थित होते.


 
Top