उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ढोकी पोलीस ठाण्यात शनिवारी दि. 26 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदाब शिबिरात 221 जणांनी रक्तदान केले. या शिबिराला ढोकी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील, होमगार्ड, तरुणांनी तसेच महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.                  

 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलीस ठाण्यात शनिवारी दि. 26 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विक्रमी 221 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कपिल बुद्धेवार, श्री. बी, वाय, गाडे, पोकॉ श्रीमंत क्षीरसागर, सपोफौं सुहास गवळी, राजाभाऊ सातपुते, मुरळीकर, सुखदेव जाधव, दत्ता थाटकर, पोलीस पाटील संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, परेश शिंदे, बिभीषण गवाड, फकिरनाथ कांबळे, केशव बटनपुरे, समाजसेवक शामराव देशमुख, संजय शिंदे, आदी उपस्थित होते. बार्शी येथील भगवंत रक्तपेढी यांच्या वतीने रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.साखरे, पर्यवेक्षक गणेश जगदाळे, सुयोग निकम, ज्ञानदीप शिराळकर, राधिका बेले, सौरभ गायकवाड, सलोनी शिंदे आदींनी पुढाकार घेतला.

 
Top