उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील बाळासाहेब जाधव सर यांची कन्या डॉ.प्रिया बाळासाहेब जाधव यांची उस्मानाबाद येथे नव्यानेच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. या बद्दल जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता रविंद्र सावंत परिवाराकडून डॉ.प्रिया जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.               

     उस्मानाबाद शहरातील बाळासाहेब जाधव सर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बार्शी रोड, जुन्या गॅस गोडाऊन पाठीमागे विद्यार्थी हॉस्टेल चालवून विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी त्यांचा एक मुलगा व एक मुलगी यांना डॉक्टर बनविले. त्यांची मुलगी डॉ.प्रिया जाधव यांची उस्मानाबाद येथे नव्यानेच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून निवड झाली. या बद्दल अभियंता रविंद्र सावंत यांच्या परिवाराकडून डॉ.प्रिया जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शीतल सावंत, मीनाताई सावंत,  उषाताई जाधव, बाळासाहेब जाधव, रविंद्र सावंत, पत्रकार सुभाष कदम उपस्थित होते.

 
Top