उस्मानाबाद/प्रतिनिधी-

 कर्तव्यावर असताना रिल्स बनवून सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्यामुळे एसटी महामंडळाची बदनामी होते, हा ठपका ठेवत कळंब आगारातील वाहक मंगल सागर गिरी या लेडी कंडाक्टरला महामंडळ प्रशासनाने १ आँक्टोबर रोजी निलंबित केले होते. या निलंबनमुळे महामंडळावर सर्व सर्व स्तरातून टीका होत होती. अखेर आज तब्बल १३ दिवसानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने वाहक मंगल सागर गिरी यांचे निलंबन रद्द केले आहे, तसा आदेश महामंडळ प्रशासनाने आज काढले आहेत.
टिक टाँक स्टार मंगल सागर गिरी या रिल्ससाठी खुप प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो फाँलोवर्स असून मंगल गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर रिल्स बनवून टिक टाँक, फेसबुक, इन्स्टाग्रामवर टाकत होत्या. त्यामुळे मंगल गिरी खुप प्रसिद्ध झाल्या होत्या.मंगल सागर गिरी यांचे फेसबुक, इंन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. त्यांच्या रिल्सला लाखो व्ह्यूज मिळतात. वेगवेगळ्या गाण्यावर, वेगवेगळ्या विषयांवर मंगल सागर गिरी यांनी रिल्स बनवले असून फेसबुक, इन्स्टाग्रामवर त्याच्या रिल्सवर अनेक लाइक्स आणि कमेंट आल्या आहेत.एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवनी देवीच्या गाण्यावर मंगल गिरी यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ तुफान गाजला होता. त्याला लाखो व्ह्यूज आणि कमेंट आल्या होत्या. मात्र, त्यांच्या याच व्हिडिओवर आक्षेप घेत एसटी महामंडळाने त्यांच्यावर १ आँक्टोबर रोजी निलंबनाची कारवाई केली होती. तसेच, मंगल यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं होतं.मात्र, त्यानंतर  निलंबित महिला वाहकाचे१३ दिवसांनंतर  निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
 
Top