उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत  महाविद्यालयीन युवक महोत्सव 2022 बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू येथे पार पडला या महोत्सवात कृषी महाविद्यालय, आळणी च्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर करत  मूक अभिनय या प्रकारात इनामदार कृष्णाई,  नोमान शेख, मृणालि शिंदे, अंकिता मोरे व प्रतीक पाटोळे  यांनी आपले कौशल्य सादर करत तृतीय पारितोषिक पटकावले तसेच अमृता निरगुडे या विद्यार्थिनीने एकांकिका या प्रकारात  उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. मूक अभिनय या प्रकारात विद्यार्थ्यांनी मोबाईल फोनचे दुष्परिणाम या विषयावर सादरीकरण केले तसेच एकांकिका या प्रकारात स्त्रियांची आत्मकथा या विषयावर सादरीकरण  करण्यात आले.

 परभणी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या शासकीय व अशासकीय घटक महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता त्यातून सर्वोत्तम सादरीकरण करत कृषी महाविद्यालय, आळणी येथील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला.  बक्षीस वितरण  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस. एस. मोरे तसेच डॉ. देशमुख, प्राध्यापक डी. एफ. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले संघ व्यवस्थापक म्हणून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. साबळे , प्रा. वाकळे  आणि डॉ. गांधले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल श्री साई जनविकास प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. के. एच. पाटील, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. घाडगे  तसेच महाविद्यालयातील  इतर प्राध्यापक  व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

 
Top