उस्मानाबाद /प्रतिनिधी-

डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी, उस्मानाबाद  येथील आर.पी. औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली द. युनिक अकॅडमी पुणे व आर.पी. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी केले.

या एकदिवसीय ऑनलाईन वेबिनार मध्ये द. युनिक अकॅडमी पुणे यांच्यातर्फे प्रा.प्रवीण बुगे यांनी विद्यार्थ्यांना MPSC, UPSC  तसेच फार्मसी क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना वेगवेगळ्या संधी या तयार कराव्या लागतात त्या बनत नसतात असे ही नमूद केले.विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवत असताना पण जर प्रमाणिकपणे काम केले तर सन्मान आणि पैसा या दोन्ही गोष्टी आपण कमावू शकतो या गोष्टीवरही प्रकाश टाकला. या ऑनलाइन वेबिनारसाठी द. युनिक अकॅडमी पुणे यांच्यातर्फे कॉर्डिनेटर म्हणून प्रा. चंद्रकांत खरात यांनी काम पाहिले तर आर.पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय मधून प्रा. निशिनंदन शिंदे सर यांनी आभार मानले. या ऑनलाईन वेबिनारसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

 
Top