उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील आझाद चौक येथील कुरेशी गल्ली समोर राहणारा युवक सोहेल मामुद शेख वय 20 या युवकाने आज सकाळी 8:30 ते 9 च्या सुमारास घरात गळफास घेतला,

 अद्याप आत्महत्येचे कारण. काय हे समजू शकले नाही. नेमका प्रकार काय व कोणत्या करणा मुळे गळफास घेतला यांची पुढील तपास पोलीस करत आहेत.मृत देह पोस्टमोअर्टम साठी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहे. 

 वीज महावितरण कार्यालयात लाईनमन म्हणून कार्यरत असलेले मामुद शेख यांचा तो एकुलता एक मुलगा होता यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 घरातील एकुलता एक मुलगा मयत झाल्याने शहरातील या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.


 
Top