उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक विद्यालयात इ.५ वी,६ वी , ७ वी वर्गासाठी पर्यावरण पूरक आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत एकूण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना पुष्प रोपे, जलकुंभ बक्षीस देण्यात आली व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .

या स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक साहेबराव देशमुख , उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी यांनी मार्गदर्शन केले तर इ. ५ वी चे स्पर्धा प्रमुख कार्यानुभव शिक्षिका सौ.पी.डी. परतापुरे,इ.६वी स्पर्धा प्रमुख सौ. एस.एम. शिंदे , इ७ वी आर.बी. बोराडे यांनी भुषविले. कलाध्यापक एस.डी. भोसले , शेषनाथ वाघ यांनी परिक्षण केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व पर्यवेक्षक डी.ए. देशमुख ,के.वाय. गायकवाड ,आर. बी. जाधव , सौ.बी.बी. गुंड ५ वी शिक्षक एन.एल. गोरसे , ए. एच. माने, एस. एच. जगताप, ए. आर. बोपलकर , सौ.लोकरे, गायकवाड, पवार ,६ वी शिक्षक ए. बी. शेरकर, विश्वास शेवाळे,सी.ए.लांडे .सी.बी. कवितकर शिक्षीका व्ही. एल. पवार. सौ .ईश्वरगौडा एम.पी ठाकूर , सौ. मोरे इ.७ वी शिक्षक डी.एस.शिराळ , दिपक केंगार सर्व शिक्षकशिक्षिका वृंदांनी . परिश्रम घेतले . स्पर्धेत सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्यालाच पर्यावरणपूरक आकाश कंदिल घरी लावण्याचे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांनी केले .


 
Top