उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शुक्रवारी जिल्हानियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होती. मंत्री सावंत परभणीहुन दुपारी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटातील शिवसैनिकांमध्ये घोषणा युध्द पहायला मिळाले. 
पालकमंत्री तानाजी सावंत मंत्री झाल्यानंतर जिल्हानियोजन मंडळाची ही पहिलीच बैठक होती. विशेष म्हणजे तानाजी सावंत यांच्याकडे परभणी व उस्मानाबाद या दोन जिल्हयाचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे मंत्री सावंत यांनी पुण्याहून हेलीकॉप्टर ने सकाळी परभणी गाठले. तर दुपारी हेलीकॉप्टरनेच उस्मानाबाद गाठले. त्यानंतर पावणेपाच वाजता जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपल्यानंतर सावंत हेलीकॉप्टर ने पुणे शहराकडे रवाना झाले. पत्रकारांशी बोलताना मंत्री सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासावर बैठकीत चर्चा होवुन ३०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असल्याची माहिती दिली. 
रंगले घोषणायुध्द

उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी आले होते. पालकमंत्री सावंत यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला. त्यानंतर सावंत व इतर लोकप्रतिनिधी बैठकीसाठी जात असतानाच दोन्ही गटाच्या शिवसैनिकांमध्ये घोषणायुध्द झाले. त्यानंतर  पाेलिस अलर्ट होवुन त्यांनी अिधकचा फौजफाटा  मांगविण्यात आला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे दोन्ही गेट बंद करून िबगर कामासाठी आलेल्या लोकांना ही परिसरातून बाहेर काढले. बाहेरच्या गेटवर पत्रकारांना ही आडविण्यात आल्याने अश्चर्यव्यक्त करण्यात आले.  

 
Top