उस्मानाबाद (प्रतिनिधी) भाजपाचा कार्यकर्ता हा आत्मा असून हा आत्मा सदृढ ठेवायला हवा. कार्यकर्ता हा ताणतणाव  विरहित, स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर असायला हवा. त्याबरोबरच तो पक्षकार्याच्या रूपाने दिलेला व्यायाम करणारा व पक्षवाढीस तत्पर सकारात्मक दृष्टिकोन असलेला हवा हे उद्दिष्ट घेऊन आपल्याला मराठवाड्यातील भारतीय जनता पार्टी सक्षम करायची असल्याचा कानमंत्र भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद दरम्यान दि.२ ऑक्टोबर रोजी दिला. दरम्यान केनेकर यांचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

केनेकर यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदावर निवड झाल्याबदल आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेऊन मराठवाडा दौऱ्याचा शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी प्रमुख उपस्थित होते.  पुढे बोलतांना केनेकर म्हणाले की, पक्षाचा कार्यक्रम ही अडचण न मानता स्वतःला नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होत असून हा विचार करून कार्यक्रम राबवावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच पक्षकार्याच्या कार्यक्रमास स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल, कोणीतरी दुसऱ्यांनी करायची वाट न पाहता आपल्या कार्यक्षेत्रात नेतृत्व करत पक्षाचे कार्यक्रम, अभियान, विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत घेऊन जाऊन स्वतःला नेता मानून कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.

तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्वच्छता मोहिम राबविण्यात येऊन धन्यवाद मोदीजी या अभियानांतर्गत जे लाभार्थी कर्ज व प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसह इतर विविध योजनांचा लाभ घेत आहेत त्यापैकी प्रतिनिधीक स्वरुपात १० लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी पत्र पाठविण्यात आले. जिल्हयात भाजपच्यावतीने सेवा पंधरवड्यात केलेल्या कार्यक्रमांचा आढावा सादर करण्यात आला.

यावेळी सुरेश देशमुख, अशोक शिंदे, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. खंडेराव चौरे, नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील, ॲड.व्यंकटराव गुंड, सतिष दंडनाईक, ॲड.अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, प्रदिप शिंदे, माधव पवार,आदम शेख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top