उस्मानाबाद  /  प्रतिनिधी -

जागतिक ज्येष्ठ नागरिक  दिनाचे औचित्य साधून धाराशिव ( उस्मानाबाद ) शहरातील समता नगर येथील मारुती मंदिरासमोरील विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत या विरंगुळा केंद्रासाठी  निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

समता नगरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी हे विरंगुळा केंद्र मंजूर केलेले आहे. आपल्या भविष्यातील धाराशिव शहराच्या संकल्पनेचा विचार आणि तो साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. असे मत आ.कैलास पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, हभप लोमटे महाराज, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री. नायगावकर काका, विनायकराव देशमुख, अँड. दिलीपराव पाटील, श्री.अत्रे सर, गटनेते सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे, माजी नगरसेवक प्रदिप घोणे, पंकज पाटील, नाना घाडगे, पंकज पडवळ, चेतन वाटवडे, सुनिल कोळी, बाळासाहेब वरुडकर आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 
Top