उस्मानाबाद /प्रतिनिधी- नवरात्र महोत्सवानिमीत्त सर्वत्र विविध देवी देवतांची आराधना व पूजा सुरु आहे तसेच नारीशक्तीचा सन्मान केला जात आहे.

 बँकीग, उस कारखानदारीसह गारमेंट क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या येथील श्री सिध्दीविनायक परिवाराच्यावतीने देखील संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतुन संस्थेच्या कार्यक्षेत्रातील महिला वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या या "नवदुर्गा" चा सन्मान श्री सिध्दीविनायक परिवाराच्या विविध शाखातील महिला कर्मचा-यांच्या हस्ते केला जात आहे. या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सिध्दीविनायक मल्टीस्टेट च्या १० शाखांच्या माध्यमातून १०० महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.

संस्थेच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान संस्थेतील नारीशक्तीच्या हस्ते करण्याचा अभिनव उपक्रम शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीत  संस्थेच्या सर्व शाखेत संस्था अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जातआहे. या अभिनव उपक्रमाचे संस्थेचे सभासद, ठेवीदार व ग्राहकांमधून स्वागत व कौतुक होत आहे.

 
Top