उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन शिगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष  कुमंत शिंदे, प्रमुख पाहुणे  शेख अब्बास अली पर्यवेक्षक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी दीपक खबोले मेसाई जवळगेकर यांनी कलाम यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विश्वात आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमासाठी  जाधव चंद्रकांत,  बर्दापुरे सूर्यकांत,  राठोड प्रशांत,   कैलास शानिमे, सतीश कुंभार,  मदन कुमार अहमदापुरे, श्रीमती व्यवहारे, श्रीमती कांबळे, श्रीमती तोगरगे व कर्मचारी  गोविंद बनसोडे,   रेवा चव्हाण,   वसंत भिसे,   रामलिंग आडे इत्यादी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   पडवळ.के.आर. उपळेकर यांनी आभार मानले.

 
Top