तुळजापूर / प्रतिनिधी-

 शारदीय नवराञ उत्सवात अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरुन  स्वच्छता  निरिक्षक दत्ता सांळुके यांच्यावर लोखंडी वस्तुने डोक्यावर वार करुन जखमी केल्याची घटना गुरुवार दि. १३रोजी सांयकाळी ६.३०वा.  भवानीरोडवर  घडली  

या हल्यात स्वछता निरक्षक दत्ता सांळुके हे गंभीर जखमी झाले असुन यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांन मध्ये दशहतीचे व भितीचे वातावरण पसरले आहे,त्यांना काम करताना त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.या प्रकरणी हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी करीत शुक्रवार रोजी कामबंद आंदोलन केले.


  कारवाईसाठी मोर्चा व कामबंद आदोल

 नगर परिषद स्वच्छता निरीक्षक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख श्री . दत्ता साळुंके यांच्यावर कोयत्याने झालेल्या प्राणघातक हल्ला घटनेचा जाहीर निषेध करून हल्लेखोरावर कठोर कार्यवाही  करावी यामागणीसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करुन उपविभागीय पोलिस अधिकारी  कार्यालयावर मोर्चा काढुन पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. 

 
Top