उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बळीराजाच्या हक्काचे 2020 च्या पीकविम्याचे पैसे तसेच या वर्षीच्या नुकसानीच्या अनुदानाची रक्कम  शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमा करा या मागणी साठी शिवसेनेचे निष्ठावंत आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपोषणाचा पाठींबा देण्यासाठी खेड्यापाड्यातील शेतकरी आज कळंब मधे रस्ता रोकोमधे सामील झाले आज उपोषणाचा पाचवा दिवस असुन शासन व वीमा कंपनीला याचे सोयर न सुतक नाही अशी अवस्था झाल्याने शिवसैनीक व शेतकरी  आकृमक झाला असून  कळंब येथील छत्रपती  शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रीगेड चे कार्यकर्ते शेतकऱ्यानी रस्ता रोको आंदोलन केले .गावागावातुन उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत आजच्या आंदोलनाची झलक असुन या पुढे आंदोलन तीवृ करण्याचा ईशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरग कुंभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा श्रीधर भवर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी यांनी आपल्या भाषणातुन दिला .

पीक विमा कंपनीने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत २०० कोटी रुपयावर शेतकर्यांची बोळवणा करून बाकीचे पैसे हडप करण्याचा प्रयत्न पीक वीमा कंपनीने चालवला असुन उर्वरीत नुकसानीचे33१ कोटी रुपये मा . उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावेत तसेच २०२१ चे ३३८ कोटी विमा कंपनीने शेतकर्याच्या हक्काचे पैसे  शेतकर्यांच्या खात्याती जमा करावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले उपोषणाचा आज  पाचवा दिवस असुन आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी गावागावातुन लोक रस्त्यावर उतरु लागले आहेत  या वेळी सरकार विरोधी घोषणेने परिसर दुमदुमुन गेला होता .

आज उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने आंदोलनातील  कार्यकर्ते शेतकरी आकृमक झाल्याचे दिसुन आले शासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्हाला वेगळा पवीत्रा घ्यावा लागेल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अॅड तानाजी चौधरी, धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक बळवंत तांबारे, माजी जी प सदस्य बालाजी जाधवर  आनंद चोंदे, युवासेनेचे उपजिल्हा सागर बाराते, उपसरपंच सचिन काळे, माजी नगरसेवक मुस्ताक खुरेशी, बाबासाहेब मडके  सुरेश शिंदे अश्रूबा बिक्कड,कॉग्रेस चे दौलतराव माने, राष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड प्रवीण यादव.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य शंतनू खंदारे, शहराध्यक्ष मुसद्देक काझी, संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, , कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कवडे,   विलास करंजकर,आदी उपस्थित होते.

 
Top