उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 2020 खरीप हंगामाचे उर्वरित 330 कोटी, 2021 चे उर्वरित 50 टक्के 388 कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे नुकसानभरपाई अनुदान 248 कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांचे 5 दिवसापासून उपोषण चालू असून अद्याप झापेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग आलेली नाही. मागण्या पुर्ण करण्यासाठी तसेच मा. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी गोगाव पाटी करजखेडा येथे तुळजापूर औसा या महामार्गावर परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सदर महामार्गावर वाहतुक कोंडी होवून महामार्गावरचे दळणवळणे ठप्प झाले होते.

  पीकविमा खरीप हंगाम 2020 चे 330 कोटी 2021 चे उर्वरित 388 कोटी, नुकसान भरपाईचे अनुदान 248 कोटी रुपये तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा तसेच पीकविमा वाटप गांभार्याने घ्यावे न घेतल्यास गांधीगिरी न करता यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा सजड इशारा रास्ता रोको आंदोलनासमयी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला. तसेच शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने जिल्हाभरात वरील मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलन करावे यासंबंधी सुचना दिल्या.

 याप्रसंगी संतोष सोमवंशी, संजय देसाई, सतिषकुमार सोमाणी, मोईन खान, आकाश पाटील, संजय खडके, सुभाष कळसुले, मुकेश पाटील, अमोल मुळे, दिनेश हेड्डा, राजाभाऊ नळेगावकर, नाना डोले, ऋषिकेश पाटील, अरुण निलंगे, मंगेश सोनवणे, नेताजी गायकवाड, अनिल अरनडर, काकासाहेब पिंपरे, सुरज इंगळे, विकास इंगळे, शंकर पाटील, दादा कोळपे, सौदागर जगताप, आबा सारडे, आदीसंह हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

 
Top