नळदुर्ग  /प्रतिनिधी -

नळदुर्ग येथील व्यासनगर येथे सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दि.१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या दीपोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

 व्यासनगर येथे माऊली महिला भजनी मंडळ, पारायण समिती व विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० ऑक्टोबर पासुन श्री संत ज्ञानेशरी पारायण सोहळा संपन्न होत आहे.या पारायण सोहळ्यास दि.१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. सायंकाळी सात वाजता याठिकाणी महिलांच्या सहकार्यातुन दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या दीपोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून करण्यात आला. यावेळी शेकडो महिलांनी दीप प्रज्वलीत केल्यानंतर पारायण सोहळ्याचा मंडप दिव्यांच्या प्रकाशात उजळुन निघाला होता. यावेळी महिला व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  हा दीपोत्सवाचा कार्यक्रम श्रीमती विमल माने, श्रीमती कमल सुर्यवंशी (मुरटेकरबाई),मंगल गायकवाड, सौ. रेखा वऱ्हाडे, सुमन जाधव, मीना काळे, दीप्ती परळकर,राखी दुबे, शोभा शिंदे, मथुरा गरड व शांता सुरवसे यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आला होता.

  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवाजीराव वऱ्हाडे, नवल जाधव, अमर भाळे, सचिन गायकवाड, विनिल जांभळे, संदीप गायकवाड यांच्यासह जयहिंद तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.


 
Top