नळदुर्ग  /प्रतिनिधी -

 नळदुर्ग शहरांतील मराठा गल्ली येथील विठ्ठल--रुक्मिणी मंदिरात पहाटेची काकडा आरती सुरू झाली आहे. पहाटे पाच वाजता महिला या काकडा आरतीसाठी मंदीरात एकत्रीत येतात. या काकडा आरतीमुळे याठिकाणी धार्मिक वातावरण तयार झाले आहे.

मराठा गल्ली येथील विठ्ठल--रुक्मिणी मंदिरात दि.१० ऑक्टोबर पासुन काकडा आरती सुरू करण्यात आली आहे. ही काकडा आरती ८ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. मराठा गल्ली येथील सुक्ष्म अरविंद माने, छायाबाई तानाजी मुळे, दिपाली धनाजी जाधव, ऋतुजा नेताजी जाधव, अनुजा जाधव, छायाबाई पवार, जयश्री जाधव, जानकी पवार, लता साळुंके, कांताबाई कदम, आशा जाधव, कमल सुरवसे, शशिकला पवार, विमलबाई काळे, शकुंतला जाधव, मंगल सुरवसे व सुमन किल्लेदार या महिला पहाटे पाच वाजता मंदिरात येऊन काकडा आरती म्हणतात. सकाळी सात वाजेपर्यंत ही काकडा आरती चालते. या काकडा आरतीमुळे वातावरणात कमालीची प्रसन्नता निर्माण होण्याबरोबरच याठिकाणचे वातावरण धार्मिक झाले आहे.


 
Top