उस्मानाबाद/प्रतिनिधी -

येथील बस स्थानकातील साहेबपणा  मिरविण्याच्या नादात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सोडण्यास आलेल्या नातेवाईकांच्या वाहनांची हवा सोडून त्यांना मन:स्ताप दिला. या प्रकारामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या शेकडो नातेवाईकांना रविवारी मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.लोकांनी संतप्त  प्रतिक्रिया  व्यक्त  केल्यानंतर या साहेबी थाट दाखवणारेनी पळ काढला

जवळपास सहा महिन्यांच्या संपानंतर एसटीपासून दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्याऐवजी एसटीचे लहरी अधिकारी, कर्मचारी अशा चमकोगिरी करत मूळ कामाऐवजी इतर गोष्टीतच लक्ष देत असल्याचे दिसू लागले आहे. उस्मानाबाद बसस्थानक परिसरात पार्किंगची सोय कुठेच नाही. त्यातही एसटीचे जे सशुल्क पार्किंग आहे, ती जागा अतिशय तोकडी आहे. तिथेही प्रवेशद्वारावर रिक्षाचालकांचे अतिक्रमण मोठे आहेत्या मुळे गेट मधुन जाता येत नाही  गावी निघालेल्या पाहुण्यांना किंवा घरातील सदस्यांना एसटी स्थानकापर्यंत पोचविण्यास येणारे बसस्थानकाच्या आतील भागात येणाऱ्या  जाणाऱ्या  बसला अडचण  येणार नाही अशा पध्दतीने  वाहने उभी करतात. तीही वाहने फार फार तर 10 ते 15 मिनिटांत निघून जातात. असे असतानाही पार्किंगसाठी जास्त जागा उपलब्ध करुन त्यातून एसटीला उत्पन्‍नाची संधी असतानाही तिकेड दुर्लक्ष करुन एसटीनेच प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या नातेइवाईकांना या लहरी अधिकार्‍यांनी रविवारी मोठा त्रास दिला. अनेक चार चाकी, दुचाकी वाहने यामुळे जागीच उभी करावी लागली. कोणतीही पूर्वसूचना न देताच ही कारवाई केल्याने काही काळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


 
Top