उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने शेत तिथे पौष्टीक तृणधान्य मोहिमे अंतर्गत रब्बी हंगामामध्ये सर्व तालुक्यामध्ये 481 क्विंटल रब्बी ज्वारीचे बियाणे पीक प्रात्यक्षिकासाठी फुले रेवती आणि फुले सुचित्रा वाणाचे बियाणे मोफत उपलब्ध झाले आहे. त्यासाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची निवड ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.

 तसेच शेत तिथे पौष्टीक तृणधान्य या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास दोन किलो रब्बी ज्वारी मिनीकिट बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच 2022-23 साठी प्रमाणीत बियाणे वितरण या बाबीखाली रब्बी ज्वारीचे (10 वर्षाच्या आतील वाण ) सर्व तालुक्यामध्ये 930 क्विंटल बियाणे 30 रुपये प्रती किलो अनुदानावर उपलब्ध आहे आणि रब्बी ज्वारीचे (10 वर्षाच्या वरील वाण ) सर्व तालुक्यामध्ये 250 क्विंटल 15 रुपये प्रती किलो अनुदानावर उपलब्ध आहे. त्यासाठी परमिट संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मिळतील.

 तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी तसेच जास्तीत जास्त अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


 
Top