उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीवरील बराज को.प.बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पाणी येणे सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टी राहून पाणी येणे असेच सुरु राहिले तर प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर प्रकल्पात जमा होणारे पाणी मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार असल्याबाबत कळवून मांजरा, तेरणा व तावरजा नदी काठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहिलेले नागरिक यांना सावधनतेचा इशारा देण्याबाबत कळवले आहे.

 तरी मांजरा, तेरणा आणि तावरजा नदी काठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहिलेले नागरिक यांना तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळवले आहे.


 
Top