उमरगा / प्रतिनिधी-

 मुरूम येथील श्री.विट्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2022-23 साठीचा गळीत हंगामाचा मोळी पुजनाचा कार्यक्रम कारखान्याचे  चेअरमन व माजी मंत्री  बसवराज पाटील   यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर  रोजी संपन्न झाला असून प्रत्यक्ष गाळपास दि.15 आक्टोबर पासून सुरुवात होणार आहे.  

मागील 2 वर्षापासून कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे ऊसाची उपलब्धता मोठया प्रमाणात असून कारखान्याने यावर्षी 6 लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. त्यानुषंगाने कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच पुरेसी वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.  तरी ऊस उत्पादक शेतकरी बांधवानी आपल्या कारखान्यास उस गाळपास देवून सहकार्य करावे.  तसेच  हंगामात प्रोग्रामप्रमाणे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यात येणार असून ऊस गाळपास घेवून जाणेबाबत ऊस उत्पादक शेतकÚयांनी घाई करू नये असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंन्केचे चेअरमन मा.श्री.बापुरावजी पाटील साहेब, उमरगा जनता सहकारी बॅंकेचे चेअरमन मा.श्री.शरणजी पाटील साहेब, कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.सादीकसाहेब काझी, .तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री विट्ठलराव पाटील, केशवराव पवार, रामकृष्ण खरोसेकर, दिलीप पाटील, शरणाप्पा पत्रिके, संगमेश्वर घाळे,  माणिकराव  राठोड, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, अॅड.संजय  बिराजदार, अॅड.विरसंगप्पा आळंगे,  व तसेच मा.सर्वश्री. प्राचार्य दिलीप गरूड, माजी सभापती सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष रशिद गुत्तेदार, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, जि.प.माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, श्रमजीवी शिक्षण संस्था संचालक मल्लिनाथ दंडगे, माजी उपसभापती व्यंकट कोरे, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी दत्ता चटगे, माजी उपसभापती गोविंद पाटील, माजी सभापती विश्वनाथ पत्रिके, संचालक उमरगा जनता सहकारी बॅंक विनय बदोले, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष योगेश राठोड, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, युवक कॉंग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी, मुरूम शहर कॉंग्रेस अध्यक्ष सुधीर चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी उमरगा जनता सहकारी बॅंक भरडे, आदी मान्यवर कार्यकारी संचालक  श्री.एम.बी.अथणी व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.


 
Top