वाशी  / प्रतिनिधी- 

 मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज दि.९आक्टोबर रोजी “जश्ने ईद मिला दुन्नबी “निमित्त मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात वाशी येथे रॅली काढण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला आहे.सकाळी ९ वाजता सय्यद शहा अब्दाल दर्गा मधून काझी गल्ली , वाणी गल्ली ,लक्ष्मी रोड,जुने बस स्टँड पासून छत्रपती शिवाजी नगर ,पोलीस स्टेशन ,आदर्श नगर ते नाईकवाडी गल्ली मार्गे दर्गा मध्ये समाप्त झाली. यावेळी  हिंदु बांधवांनी शुभेच्छा दिल्या.जुन्या बसस्थानक आवारात उपनगराध्यक्ष सुरेश कवडे व नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या  रॅलीचे वेशीजवळ शिवसेना नेते प्रशांत चेडे व मित्रमंडळींनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.तसेच वाणी गल्लीमध्ये नगरसेवक बळवंत कवडे,राजाभाऊ चौधरी व अॅड.सुर्यकांत सांडसे यांनी रॅलीमधील लोकांच्यावर पुष्पवृष्टी केली.शहरात ठिक ठिकाणी  अल्पपोपहार, शरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले.सय्यद शहा अब्दाल दर्गामध्ये कमेटी तर्फे महाप्रसाद वाटपाने सांगता झाली.

    यावेळी रॅली मध्ये मुस्लिम बांधवांनी आपल्या गुरु पैगंबरांचे गुणगान करीत शांततेत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविले.यावेळी गावातील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते तसेच पोलीस निरीक्षक  सुरेश बुधवंत , निंबाळकर साहेब यांच्या सह पोलीस ठाण्याच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला .


 
Top