उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सामुदाियक सहभागासाठी संयुक्त सहकार्य अंतर्गत नागरीकांच्या सामाजिक प्रश्नांसंबंधाने पोलीस दलातील कामकाजाबाबत तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर येथील 52 विद्यार्थांना दि. 13.08.2022 ते दि. 17.09.2022 या एक महिनीच्या कालावधीकरीता कार्यअभ्यास देण्यात आला होता. या दरम्यान त्या विद्यार्थ्यांना दलितांवरील अत्याचार, बालविवाह, सायबर सुरक्षा, शेतकरी आत्महत्या, अनुसूचित जाती जमाती यांचा विकास, मिसींग प्रकरणे, महिलांवरील अत्याचार इत्यादी विषय देण्यात आले. यात त्या विद्यार्थ्यांनी नमूद विषयांसंबंधाने पोलीसांच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी एक महिन्याची इंटर्नशीप उत्कृष्ठरित्या पुर्ण केल्याने  टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर येथे उस्मानाबाद पोलीस दलातर्फे  पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देउन त्यांना सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमास पोलीस टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूरचे डीन- रमेश जरे, उप प्राचार्य  श्रीधर सामंत यांसह संस्थेचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे,  आनंद भालेराव,   शंकर ठाकरे हे उपस्थित होते.


 
Top