उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  मुक्ताई महिला नागरी पतसंस्थेची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बालाजी मंदिर, मारवाडी गल्ली, उस्मानाबाद येथे संस्थेचे अध्यक्ष सौ. सुलभा सुहास उंडे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली.

संस्थेच्या अध्यक्षानी संस्थेचे भाग भांडवल ३५ लाख रूपये असल्याचे सांगीतले असून ठेवी ८ कोटी तसेच कर्जवाटप ६ कोटी व गुंतवणूक ३ कोटी असल्याचे सांगितले. संस्थेस मागील आर्थिक वर्ष २०२१-२०२२ साठी लेखा परिक्षण वर्ग ‘अ’ मिळाल्याचे सांगितले.

तसेच संस्थेच्या सभासदांना चालु आर्थिक वर्षात नफ्यातून १०% लाभांष देण्याचे जाहीर केले आहे. कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक  सुहास उंडे, विजयकुमार कोळगे, अभिजीत पाटील, नागेश जगदाळे, पंकज पवार उपस्थित होते तसेच संस्थेच्या सर्व संचालिका व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी  अनिल पाटील,  राहुल उडे,  सोमनाथ माने,  बाळासाहेब मगर,  सतिश शिंदे, लक्ष्मण सगर, श्रीकांत पवार,  सुनिल गायकवाड,  हनुमंत दाते यांनी परिश्रम केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक   नवनाथ पवार यांनी केले.

 
Top