उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विकास समिती उस्मानाबादच्या वतीने उस्मानाबाद येथील निसर्गरम्य अशा हातलाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

निसर्गरम्य डोंगरावर हातलाई देवीचे मंदिर असुन नुकतेच नवरात्र उत्सव चालु झाला आहे,भुम येथील पर्यटनासाठी आलेल्या महिला मंडळातील महिला भगिनींनी यात सहभाग घेतला,जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन आज रोजी स्वच्छता मोहीम घेऊन आलेल्या पर्यटकांना देखिल स्वच्छतेचा संदेश याद्वारे समितीचे अध्यक्ष युवराज बप्पा नळे यांनी दिला.अभियानात समितीचे अध्यक्ष युवराज बप्पा नळे, अब्दुल लतिफ, राजेंद्र अत्रे,अभिमान हंगरगेकर,रणजीत रणदिवे, गणेश रानबा वाघमारे,राजाभाऊ करांडे ,राजभाऊ परदेशी,पप्पु बचाटे, महेंद्र बिदरकर अन्य इतर उपस्थित होते.

 
Top