तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्री  तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील नवव्या माळे दिनी  मंगळवारी ( दि .४) दुपारी  होमावर  अजाबली  देण्यात आल्यानंतर  घट उठविण्यात  आले.  यावेळी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती . 

  मंगळवार  पहाटे एक बाजता चरणतीर्थ होवून धर्मदर्शनास प्रारंभ झाला . त्यानंतर सकाळी पाच  वाजता भाविकांच्या दहिदूध पंचामृत अभिषेक करण्यात आले.  त्यानंतर सिंदफळ ( ता. तुळजापूर )  लांडगे यांनी अजाबळीसाठी दिलेल्या  बक-याचा होमावर जीवन  वाघमारे यांनी तलवारीने वार करुन  अजाबळी देण्यात आला.  नंतह मंदिरसह  परिसरातील उपदेवतांचे घट उठवण्यात आले.  त्यानंतर तुळजापुरातील घरघरातील घट उठविण्यात आले. हे धार्मिक विधी झाल्यानंतर ज्या भक्तांनी  उपवास केला होता त्यांनी  देवीस दाखविलेला नैवेद्य प्राशन  करून उपवास सोडला.  यानंतर मंदिर समितीच्या वतीने   अजाबळी देणारे जीवन वाघमारे व बकरा देणाऱ्या गजेंद्र लांडगे यांचा भरपेहराव आहेर देवून यथोचित सन्मान केला. या महानवमीदिनी देवी दर्शनासाठी आंध्र , कर्नाटकसह राज्यभरातील लाखभर देवीभक्तांनी तीर्थक्षेत्र तुळजापुरात हजेरी लावली होती. 


 
Top