उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा येथील श्रीक्षेत्र रेणुकादेवी मंदिराचा छबीना मोठ्या उत्साहात हलगी,ढोल,संभळ व बँजोच्या गजरात पार पडला. उमरगा गोंधळवाडा येथील श्रीक्षेत्र रेणुकादेवीचा छबीना मंगळवारी पहाटे ४.४५ मिनीटांनी निघाला व मोठ्या उत्साहात हलगी,धनगरी ढोल ,संभळ या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व आराधी पोत खेळीत पार पडला.

प्रथम मंदिरात श्रीदेवींची व पालखीची आरती मंडळाचे अध्यक्ष अरुण ईगवे  व सचिव संजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील धान्याचे घट हलवुन छबीन्याची सुरुवात करण्यात आली. रेणुकादेवी मंदिरापासुन निघालेला छबीना हनुमान मंदिर रोड ते एस.टी.काॅलनी ते मेन रोड मार्गे मंदिराजवळ अशा मार्गे काढण्यात आला.

छबीना सुरु होताच पालखीमागे सुवासीनी महिला आरतीचे ताट घेवुन तर आराधी हातात पोत घेवुन हलगीच्या तालावर पोत खेळत होती. श्रीदेवींची पालखी ज्या मार्गाहुन जात होती त्या परीसरातील भावीक महिलानी घरासमोर सडा, रांगोळी घालुन पालखीला आरतीचे औक्षण करुन नमन करीत होत्या.

भल्या पहाटे देवींचा छबीना निघतो तरी नागरीक एकक्षण देवींचा छबीना पहान्यासाठी व पुजाअर्चा करण्यासाठी मध्यरात्री पासुनच तयारी करीत असतात. मंदीराच्या प्रतीवर्षीच्या नियमाप्रमाने सुर्वोदयापुर्वी श्रीदेवींची पालखी मंदिरात परत येते त्याच प्रमाने यावर्षी श्रीदेवींची पालखी सुर्वोदयापुर्वी मंदिरात दाखल झाली.

यावेळी भावीक महिला,पुरुष,लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहात छबीन्यात सामिल झाली होती.यावर्षीचा श्रीरेणुकादेवी मंदिराचा नवरात्र मोहोत्सव पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अरुण ईगवे, सचिव संजय चव्हाण,उपाध्यक्ष अविनाश साळुंके, कार्याध्यक्ष सुरेश उबाळे, कोषाध्यक्ष रामलिंग घोगरे, सह सचिव प्रल्हाद घोगरे, मंदिराचे पुजारी माधव पांचगे, सल्लागार समितीचे राजेंद्र साळुंके, विक्रम पाचंगे,अभय रेणके,किसनराव घोगरे, रुकमण्णा चव्हाण,रमेश ईंगळे, हरी पाचंगे, गोविंद घोगरे ,नरसींग गरड आदींसह तरुण मंडळातील किरण शिंगनाथ,आकाश गायकवाड, अभिमन्यु अबाचने,किरण स्वामी,विष्णु पांचाळ, गणेश पांचगे, शाम काळे,करण काळे, आकाश उघडे,दिपक शिगनाथ,हरीश पांचगे, रोहित पांचगे, ओमकार गाडेकर, महेश सुर्यवंशी, शिवाजी सुरवसे, भवानी घोगरे आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.

 
Top