वाशी / प्रतिनिधी-

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा, यानिमित्त व मुकरम जहागिरदार सामाजिक बहुउद्देशीय  संस्था शिराढोण तालुका कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर व  शासकीय योजनेची माहिती सर्व नागरिकांना देऊन विविध आरोग्य तपासणी करण्यात आली.  

प्रारंभी लालबहादूर शात्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन  वाशी चे नगरसेवक वंदना कवडे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे यांच्या हस्ते झाले.  या कार्यक्रमात उपस्थित वैद्यकीय डॉ. संजीवन गरड सर , वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविन कुलकर्णी,   वैद्यकीय अधिकारी डेंटल डॉ. सोनाली गाढवे , डॉ. मनोज डांगे, समुपदेशन परमेश्वर तुंदारे उपस्थित होते. या सर्व डॉक्टरांनी विविध आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन लतिफा जहागिरदार  केले व सुत्रसंचालन समुपदेशक परमेश्वर तुदांरे यांनी केले 

त्याचप्रमाणे डॉ. उतरेश्वर उबाळे यांनी तंबाखू विरोधी मार्गदर्शन केले व शपथ घेतली व या कार्यक्रमाचे आभार तुदांरे   व लतिका जहागिरदार यांनी केले.


 
Top