तुळजापूर  / प्रतिनिधी-

  तालुक्यात  सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिके काढणीत अडथळा येत असल्याने पिके शेतातच असल्याने बाजार समितीत येणारी शेतमल आवक थंडावली आहे.

मागील वर्षी याच दिवसात पन्नास किलोचा  सातशे ते आठशे सोयाबीन आवाक होती ती यंदा ८० ते  १०० क्विंटल वर आली आहे. आलेली आवक शेतमाल जुना आहे नवा शेतमाल  अधाप बाजार समितीत विक्रीस आलाच नाही. सोयाबीन सारखीच परिस्थिती उडीद मुगाची आहे याची आवक चाळीस पन्नास किलोचा बँग पन्नास चाळीस तीस अशा आवक रुपात येत आहेत 

 मागील वर्षा जिल्हयात तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधीक १ लाख ३०हजार  क्विंटल इतकी विक्रमी आवक आली होती. यंदा पावसाने खोळंबा केल्याने सोयाबीन  आवक घटण्याची शक्यता आहे.


 
Top