उस्मानाबाद  /प्रतिनिधी-  

म.गांधीजी यांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे त्यांची अहिंसेची शिकवण जगातही ओळखली जाते त्याचबरोबर म.गांधीजींनी स्वच्छतेचीही शिकवण दिली आहे तेंव्हा आपण प्रत्येकांनी स्वच्छतेला महत्व देऊन नियमितपणे आपले घर व परिसरातील स्वच्छता करतानाच आपल्या महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करावा व त्यामध्ये नियमितपणा ठेवावा ही स्वच्छता केवळ म.गांधीजींच्या जयंतीदिनी एका दिवसासाठी मर्यादित नसावी असे प्रतिपादन प्रकल्यअधिकारी प्रा.माधव उगिले यांनी  श्री स्वामी विवेकानंद

 शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती २आँक्टोंबर रोजी साजरी करताना केले आहे.यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख  यांनी म.गांधीजी व लाल बहाद्दूर शास्ञी यांचे प्रतिमेचे पुजन केले.

प्रारंभी त्यांनी संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्यहार अर्पण करून पुजन केले.पुढे बोलताना प्रा.उगिले म्हणाले की,लाल बहाद्दूर शास्ञी यांनी देशाचा कारभार प्रामाणिक केल्याने आजही त्यांचे प्रशंसनीय कार्य आजच्या राजकारणी यांना आदर्श आहे.

    यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून महाविद्यालयात व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यावेळी एन.एस.एस.स्वयंसेवकाबरोबरच प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी यांचेबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक , प्रकल्पअधिकारी प्रा.बालाजी नगरे, प्रा. मोहन राठोड, प्रा. स्वाती बैनवाड व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता केली.


 
Top