उस्मानाबाद  /प्रतिनिधी-  

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित प्रथम  वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया तसेच अभियांत्रिकी मधील नवीन शाखांविषयी माहिती यावर  मोफत मार्गदर्शन शिबीर 

उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे  दिनांक ३ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता हॉटेल मेघमल्हार , समर्थ नगर येथे प्रथम  वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-   २३ तसेच अभियांत्रिकीमधील नवीन शाखांच्या मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे . औद्योगिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि राधे इंजिनीरिंग सर्विसेस चे संस्थापक  श्री. सचिन वाळके  सर  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे . प्रवेश प्रक्रियेची माहिती तसेच ऑपशन फॉर्म भरताना नेहमी होणाऱ्या चुका , टीएफडब्ल्यूस म्हणजे काय ,इडब्लूएस, कास्ट व्हॅलिडिटी केंव्हा पर्यंत देणे बंधनकारक आहे या  विषयीची  माहिती मार्गदर्शन कार्यक्रमात सांगितली जाणार आहे . अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल , कॉम्पुटर सायन्स , इलेकट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन , सिव्हिल इंजिनीरिंग या शाखेत विद्यार्थ्यांचा कल नेहमी असतोच तसेच नवीन शाखा आर्टिफिशिअल इंटेलिजंस व डेटा सायन्स त्यातील संधी या कार्यक्रमात प्रमुखपणे सांगण्यात येणार आहे . प्रथम वर्ष  अभियांत्रिकी प्रवेशास इच्छुक सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास हजर रहावे असे आवाहन  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने यांनी केले आहे यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी संपर्क :9309288076


 
Top