तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील गोंधळवाडी येथे श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापुर पालखी क्र १७ चे दिनांक २०  रोजी  आगमन झाले. या पालखीचे सात दिवस येथे मुक्काम असुन  पाडव्या दिनी मेंढराचा लेडींचे पुजन काढण्यात आली व गुरुवारी  पालखीची मिरवणूक काढुन  या सप्ताहाचा सांगता झाली.  पालखी पुढील गावी रवाना झाली.  

श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापुर पालखी क्र १७ चे दिनांक २०  रोजी  आगमन झाले त्यानंतर येथे दररोज सकाळ संध्याकाळ आरतीमहाप्रसाद   दर्शन अदि कार्यक्रम होत होते. या  आरतीला हजारो भाविक उपस्थित होते. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी मेंढरांची कात्रण करण्यात आले होते. ही कात्रण वर्षातून २ वेळी केली जाते. पाडव्या दिनी   लेंढी पूजन आणि मेंढर भूजवणे कार्यक्रम पार पडले नंतर  ज्या दिशेला दूध ऊतू जाईल त्या दिशेने पालखी  वर्षभर प्रवास चालू होतो. व त्या दिशेला खूप सुख समृद्धी असते.

 ह्या पालखी मध्ये ३५०० मेंढरे आहेत. बाळूमामांच्या १८ पालखी आहेत.१ लाख मेंढरे आहेत. बाळूमामाच्या मेंढरांची सेवा म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. आयुष्यात येऊन एकदा तरी सेवा करावी, बाळूमामांचे कोण वशंज नाही,  बाळूमामांनी सांगितले होते.  १८ प्रकारचे रोग येतील. हे पाहीला मिळत आहे.,१७ नंबर पालखीचे प्रमुख लहू  लेंगरे ,राजेंद्र अनूसे  ,दादासाहेब लेंगरे, अप्पूसाहेब वाघमोडे ,पालखीचे पुजारी अनिकेत देशमुख, अश्वप्रेमी सुनिल  दोलतडे,राम   सत्रे, विजय   येडगे आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक ऊपस्थित होते.


 
Top