तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ  तुळजापूर शहरासह परिसरात दिवाळी पाडवा व भाऊबीज सण पारंपरिक पध्दतीने  बुधवार दि.२६ रोजी साजरा करण्यात आला. दिपावली पाडव्यानिमित्ताने देविजींना संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते.तर रांगोळी व दिपज्योतीने मंदीर परिसर आज तेजोमय दिसत होता.

कलाविष्कार ग्रुप तर्फ मंदीरात भावगीत भक्ती गीत कार्यक्रम संपन्न झाला.  मंदीरात दिपरंगोत्सव  रांगोळी व रंगोत्सव काढुन साजरा करण्यात आला.  दीपोत्सवातील मुख्य दिवस व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दिवाळी पाडवा सणा निमित्ताने अनेकांनी सोने -चांदी , इलेक्ट्रॉनिक वस्तु , चारचाकी, ट्रँक्टर, दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या. नवी वाहने अनेकांनी मंदीर समोर आणुन पुजन केले.


 
Top