उस्मानाबाद / प्रतिनिधी-

समाज कल्याण विभाग उस्मानाबाद व यश मेडिकल फाउंडेशन येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार  (दि.7 ऑक्टोबर ) रोजी डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ निसर्ग मंडळ मंडळाचे डी.फार्मसी व बी.फार्मसी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद येथे व्यसनमुक्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून डॉ.प्रतापसिंह पाटील,व्याख्याते म्हणून डॉ.संदीप तांबारे  तर  व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांची उपस्थिती होती.

 कार्यक्रमास सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना प्राचार्य डॉ.सुरज नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात सर्व व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला आपल्या मनोगतातून दिला. 

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, जीवनात आनंदाने जगायचे असेल तर आरोग्य,शिक्षण व वेळ तीन गोष्टी चांगल्या आत्मसात कराव्यात. या तीन गोष्टी जर चांगल्या पद्धतीनं पाळल्या तर  जीवन आनंदी होते. माणसाला जीवन एकदाच मिळते लाईफ सुंदर आहे. विद्यार्थ्यांनी आपला वेळ विनाकारण वाया न घालवता आपल्या  ध्येयासाठी खर्च केला तर यशस्वी आयुष्याचे शिखर गाठता येते.युवकांनी व्यसनापासून दूर राहणे हीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे ही त्यांनी सांगितले .

  यावेळी  व्याख्याते डॉ.संदीप तांबारे यांनी व्यसनामुळे माणसाच्या शरीराची ,वेळेची, पैशाची नासाडी झाल्यामुळे व्यसनी माणसाच्या जीवनात नैराश्य येते. व्यसनामुळे भारतात दरवर्षीला 10 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनापासूनच व्यसन न करण्याचा संकल्प करावा.     

   व्यसनामुळे माणसाच्या तीन पिढ्या बरबाद होतात स्वतः ,आई-वडील व मुले यांचे जीवन दुःख होते. व्यसनामुळे  कुटुंबाला जर  धोका होत असेल तर व्यसनच न करणे हेच चांगले कारण माणूस आपलं व कुटुंबाचे आयुष्य चांगले जावे म्हणून जगत असतो परंतु व्यसन जर माणसाला दुःखात लोटत असेल तर ते व्यसन न केलेलेच चांगले असे विद्यार्थ्यांना उदाहरणासह पटवून दिले.बोटाच्या नकापासून ते  डोक्याच्या केसापर्यंत शरीराचा सर्व अवयवांवर दुष्परिणाम करते त्यामुळे दारू पिणारी ,व्यसन करणारा  व्यक्ती कुठे जरी गेला तरी  सहजच लक्षात येते.

 यावेळी कार्यक्रमाला प्राचार्य सतिश मातने,अमोल वाघमारे,एस.आर.केदार, ए.एस. मते ,एन एच शेरखाने ,ए.बी.उंबरे  पी.बी. धस  सह  कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अक्षता खडके तर आभार राजेंद्र नागरगोजे यांनी मानले.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  यश मेडिकल फाउंडेशनचे  राजेश तामाने, सुजित ढेकळे व  वेदप्रकाश  शैक्षणिक संकुलातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top