उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   गायक व संगीतप्रिय रासिक कै. पांडुरंग वडगावकर यांनी दीपोत्सव : एक स्वरपर्व’ या कार्यक्रमाची सुरवात सन २००० साली केली, त्यास आज बावीस वर्षे झाली असून या कार्यक्रमान्य वाट्याल आता रौप्यमहोत्सवाकडे सुरू झालेली आहे. ही बाब संगीतप्रेमी रसिकांसाने निश्चितस्य आनंदाची आहे.

संगीत ऐकले प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे मनाला आनंद मिळतो व प्रसन्नता लाभते, ही गोष्ट लक्षात घेऊन कै. पाडुरंग वडगावकर यांनी दिवाळीपूर्वी संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीते, भारतीत,. भक्तीगीने इ-या समावेश करून राभिकांना संगीताची मेजवानी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय यांनी त्यात सातत्य राखले. त्याचा हा २२वा कार्यक्रम मेघमल्हार’ सभागृहात दि.२२ रोजी संपन्न झाला.

यावर्षीचे हे श्वे पुष्प सुप्रसिधा गायिका सौ. मानसी स्वरुप देशपांडे यांनी गुंफले. शग: श्री नेत्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. क्लिनिन’ एकतालातील बंदीशीचे शब्द होते, सांज भयी।’ तर झुत तालातील शब्द होते चलो रे माई रामजी के दर्शन को। यानंतर त्यांनी तराना सादर केला. त्यानंतर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण रागमाला सादर केली.त्याचे वैशिष्ट्य असे होते की, त्यातल्या प्रत्येक ओळीत वेगळा राग होता. कट्यार काम्ब्जात घुसली’ या नाटकानली लागे करजवा कटार’ ही नाट्यगीन हमी, ययाती देवयानी न्या’ नाटकातले, हे सुरांनो चंद्रव्हा’ हे नाट्यगीत, मंदारमाला नाटकातले । सोहम् हर डम बाजे नाट्यगीत, ‘आभी आनंटेनाचू गाऊ र पमनाना नारायणा ही भक्तीगीते गाकन व शेक्य कान्होपात्रा) नाटकातल्यां अगा वहुंठीच्या राजा’ या नाट्यपट भैरीने शेवट करून सुमारे अडीच तास गायन करून रासांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संवादिम्बिी साथ स्वरूप देशपांडे यांनी, तबल्याची साथ मुकुंद मिरगे यांनी तर मंजिरीची साथ अण्णा वडगावकर यांनी केली.

शेवटी वडगावकार कुटुंबियांनी एकत्रितपमे ‘ अगा पाइरंगा’ ही भैरवी सादर केली. त्यात श्रीमती सुलना, सुषमा-प्रकार, वीणा- विलास, सरोजिनी-पांडुरंग, श्रीकांत-जन्यत्री, प्रज्ञा-राजेश, वैशाली-अशोक, नीता-चंद्रकांत, वैजयंती-संजन्य, ज्योती -प्रसाद, वैभव-कृपाली, बीना-श्रीकांत, सीमा-वेंकटेश, बागेश्री-पवन, सारंग- सोनाली, भाग्यश्री-प्रमोद, मानसी-मनीष, स्वानंदी-अजय व वसुधा-देवीदास यांचा समावेश होता. या भैरवीर संवादितम्थी साम्य पांडुरंग देशपांडे यांनी तर तबल्याची साथ अण्णा बडगावकर यांनी केली. ज्योति प्रसाद देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सध्यमहोत्सवासाने सूचना देण्याचे निकांना आवाहन अॅड. देवीदास वडगावकर व भव कुलकर्णी यांनी केले. परळकर यांनी आभार मानले. विविध क्षेत्रातील मान्यवरांची व शक्षकांची या कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती.

 
Top