उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  श्री संत गोरोबा काकां यांच्या  पायी वार्षिक पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी   दिनांक २६ ऑक्टोबर  भाऊबीजे दिवशी  आ. राणाजगजितसिंह पाटील, उस्मानाबाद येथील सह. धर्मादाय आयुक्त एस .पी. पाईकराव व  निरीक्षक एस .सी. बनसोडे यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान होणार आहे .

  यावेळी हा पालखी सोहळा दि. २६आँक्टोबर  हिंगळजवाडी , दि. २७  रोजी उस्मानाबाद शहरात दाखल होत असून , दि. २८ भातंबरे येथील मुक्कामानंतर ,  दि.२९  रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे  29 आँक्टोबर रोजी  वैराग , दि.३० यावली , दि.३१ खैराव , दि.१ नोव्हेंबर रोजी अनगर , दि.२ रोपळे  , गुरुवार दि.३  नोव्हेंबर रोजी  पहाटे हा पालखी सोहळा पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तिरावर   दाखल होणार आहे.   4  नोव्हेंबर रोजीच्या कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्ळानंतर   पंढरपूरातील पाच दिवसांच्या मुक्काम संपवून मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने  निघणार आहे.    परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन येवती , खंडोबाचीवाडी  , कुंभेज , कापसेवाडी , काळेगाव , साकत , पिंपरी , कौडगाव , सांजा , काजळा , मार्गे मजल दर मजल करत शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गोरोबा काकांच्या पायी पालखी सोहळ्याचे तेर नगरीत आगमन होणार आहे विशेष म्हणजे या पायी पालखी सोहळ्यात ठिक ठिकाणी नामवंत कीर्तनकाराची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे .यामध्ये हभप पद्मनाभ महाराज व्यास , हभप दिलीप महाराज पाटील , हभप राजन महाराज काशिद , हभप भिमराव महाराज आवटे , हभप आबा महाराज शिंदे , हभप दिपक महाराज खरात , हभप विलास महाराज मुळे , हभप उत्तम महाराज चव्हाण , हभप चंदर महाराज शेळके , हभप शिवाजी महाराज रोगे , हभप नामदेव महाराज थोडसरे , हभप भारत महाराज लोखंडे , हभप सुनील महाराज माळी , हभप काका महाराज सुर्यवंशी , हभप महादेव महाराज काशिद , हभप महेश महाराज भोरे , हभप अप्पा महाराज जावळे , हभप अॅड पांडुरंग महाराज लोमटे , हभप शिवाजी महाराज घाडगे आदि कीर्तनकाराची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे ज्या भाविक भक्तांसह नागरिकांना पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे .त्यांनी मंदिर प्रशासणाकडे संपर्क साधावा असे   आवाहंन प्रशासकीय अधिकारी एस सी बनसोडे व व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे .

 
Top