उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नितीन काळे यांनी मालकांच्या सांगण्यावरुन लोकनियुक्त आमदारांवर बोलायच्या भानगडीत पडु नये, तुमचे मालक कोणासाठी भांडले हे जिल्ह्याला माहिती झाले आहे. तुम्ही ज्या कैलास पाटलांवर बोलत आहात, त्यानी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे केले आहे, तुम्हाला यातना का होत आहेत ? असा प्रश्न पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव यानी केला आहे.

 नितीन काळे यांनी आमदारांना अडीच वर्षात शेतकऱ्यांशी बेईमानी केल्याचा आरोप केला, या अडीच वर्षात आमदारांनी काय केले हे ऐकायचे असेल तर एका व्यासपीठावर येऊन चर्चा करु असे अवाहन शाम जाधव यानी दिले आहे. अजुनही शेतकऱ्यांची नाही तर कंपनीचीच काळजी करताय हेच तुमच्या बोलण्यावरुन समोर येऊ लागले आहे. स्क्रिप्ट वाचताना जरा आपल्या अंर्तमनाला प्रश्न विचारला असता म्हणजे खर उत्तर मिळाले असते. तत्कालिन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी खरीप 2020 मध्ये शेतकरी संकाटात असताना स्वतः बांधावर येऊन शेतकऱ्यांना धीर दिला. त्यांना भरघोस मदत देऊन आधार दिला याचा विसर तुम्हाला पडलेला दिसतो आहे. तेव्हा तुमचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याने मदत जाहीर करावी व त्यानंतर केंद्राकडुन मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा शब्द याच जिल्ह्यात देऊन गेले होते. 2020 सालापासुन आतापर्यंत केंद्राची मदत का मिळाली नाही, ती तर सोडाच पण तुमचे सरकार राज्यात येऊनही तुम्हाला मदत देता आली नाही. तुमच्या एकाही मंत्र्याला अशा आपत्तीच्या काळात जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांची वेळ काढता आला नाही. शेतकऱ्यांशी असलेली ही बेईमानी आहे, त्याच शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीपुजन असतानाही शेतकऱ्यांसाठी आमदार रस्त्यावर उतरुन निकराचा लढा देत आहे. त्याला तुम्ही बेईमानी म्हणत असाल तर हा शेतकरी तुम्हाला व तुमच्या नेत्याला कधीच माफ करणार नाही. अमुक विमा तमुक अनुदान आल्याचा बोबाटा करताना खात्यावर किती पडले हा साधा प्रश्न शेतकरी उपस्थित करत असताना तुम्ही स्क्रिप्टच्या बाहेर बघायलाच तयार नसल्याचा खोचक टोला शाम जाधव यानी लगावला. आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणुन काम करत असल्याने शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत, कंपनीच्या बाजुने लढणाऱ्यानी शेतकऱ्यांच्या विरोधात लढा उभारला तर आश्चर्य वाटणार नसल्याचे शाम जाधव यानी सांगितले.

 
Top